ऑनस्क्रीनची तडफदार जोडी आमिर-सलमान पुन्हा एकत्र येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

बॉलीवूडमधील काही ऑनस्क्रीन जोड्या आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक जोडी म्हणजे सलमान खान आणि आमिर खान. ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटामधील या दोघांची जोडी सुपरहिट ठरली. आता जवळपास २५ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्‍वेल येत आहे. या सीक्वेलमध्ये कोणते कलाकार झळकणार याविषयी बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे.

अखेरीस सलमान-आमिरचे नाव ‘अंदाज अपना अपना’च्या सीक्वेलसाठी फायनल करण्यात आले आहे. या चित्रपटाचे लेखक दिलीप शुक्‍ला यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ‘सलमान-आमिरशिवाय या चित्रपटाचा सीक्वेल होणे शक्‍यच नाही. या दोघांबरोबरच आणखी काही नवे कलाकारही यामध्ये काम करताना दिसतील.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News