VIDEO-बॉयफ्रेंडसोबत आमिर खानच्या लेकीचा रोमँटिक डान्स व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 28 June 2019

इरा ही आमिर आणि त्याची पहिली पत्नी रिना दत्ता यांची मुलगी आहे. मागील वर्षी रमजानच्या काळआत इरासोबत शेअर केलेल्या एका फोटोमुळे आमिरला टीका सहन करावी लागली होती. 

मुंबई: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आहे. इराचा आणि मिशाल कृपलानीला चा रोमँटिक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच इरानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमधून ती मिशाल कृपलानीला डेट करत असल्याचा खुलासा केला होता.

इरा आणि मिशालचा रोमँटिक डान्स

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये इरा आणि मिशाल कपल डान्स करताना दिसत आहेत. याशिवाय त्यांच्यासोबत त्यांचे काही कॉमन फ्रेंडसुद्धा आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना इरानं त्याला, 'मला फक्त तुझ्यासोबत डान्स करायचा आहे'असं कॅप्शन दिलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News