आलिया - प्रियांकानंतर जॅकलिनला यू-ट्युबचं वेड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्राने यू-ट्युब चॅनल सुरू केल्याची जोरदार चर्चा होती. या दोघींच्या पाठोपाठ आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही यू-ट्यूबकडे वळली आहे.

मुंबई : काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट आणि प्रियांका चोप्राने यू-ट्युब चॅनल सुरू केल्याची जोरदार चर्चा होती. या दोघींच्या पाठोपाठ आता अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही यू-ट्यूबकडे वळली आहे. अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता ती स्वतःचे यू-ट्यूब चॅनेल सुरू करणार आहे.

या यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून ती तिच्या चाहत्यांना तिचं शेड्युल, मेकअप, फॅशन, फिटनेसबद्दल टीप्स देताना दिसणार आहे. विशेष म्हणजे ती फिटनेस आणि फॅशनव्यतिरिक्त आनंदी कसे राहायला हवे, भित्रेपणावर कशी मात करावी यांसारख्या अनेक गोष्टी  यू-ट्युब चॅनेलवर चाहत्यांना पाहायला मिळणार आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News