खेकड्यामुळे धरण कसं फुटू शकतं? विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना विचारला प्रश्न; हे दिले उत्तर 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

आदित्य ठाकरेंना एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थित एक अवघड पण थेट प्रश्न विचारला. खेकड्यामुळे धरण कसं फुटू शकतं? या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं.

सोलापूर : शिवसेनेच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा सुरु असताना आदित्य ठाकरे यांनी सोलापुरातील वालचंद कॉलेजमध्ये ‘आदित्य युवा संवाद’ कार्यकमातंर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.  आदित्य ठाकरेंना एका विद्यार्थ्याने आदित्य ठाकरेंना जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थित एक अवघड पण थेट प्रश्न विचारला. खेकड्यामुळे धरण कसं फुटू शकतं? या प्रश्नाला आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं.

तानाजी सावंत यांनी रत्नागिरीतील तिवरे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचं विधान केल्याने, त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. राष्ट्रवादीने तर त्यांच्या पुण्यातील घरी खेकडे सोडून दिले होते. आदित्य ठाकरे विद्यार्थ्याच्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले, “एखाद्या ठिकाणी एखादी जागा खेकड्यांनी भुसभुशीत केली असेल तर धरण फुटू शकतं हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालं आहे. धरण फुटण्यासाठी अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी एक कारण म्हणजे खेकडे असू शकतात” आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं त्यावेळी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत हे उपस्थित होते. 

आदित्य ठाकरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थी जे विविध परीक्षा पास होतात, त्यांना रोजगारासाठी पुणे आणि मुंबईत जावं लागतं. त्यांना IT मधील नोकऱ्या सोलापुरात उपलब्ध व्हाव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यावेळी आदित्य यांनी अशा कंपन्या सोलापुरात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News