बीडमध्ये 9.4 मिमी पावसाची नोंद

दत्ता देशमुख
Saturday, 22 June 2019
  • शुक्रवारी व शनिवारी मध्यरात्री सरासरी 9.4 मिमी पावसाची नोंद झाली
  • सरासरी 9.4 मिमी पावसाची नोंद झाली
  • आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या 3. 63 टक्के एवढा पाऊस झाला आहे.

बीड -  जून महिन्याच्या सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर मोठ्या खंडानंतर शुक्रवारी व शनिवारी मध्यरात्री जिल्ह्यात मध्यम पावसाने हजेरी लावली सरासरी 9.4 मिमी पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या 3. 63 टक्के एवढा पाऊस झाला आहे.

मागच्या वर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस झाला होता. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666. 36 असून गतवर्षी 334 एवढा पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्याला दुष्काळाच्या तिव्र झळाचा सामना करावा लागत होता.

दरम्यान यंदा जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात वादळासह पावसाने हजेरी लावल्यानंतर मोठा खंड पडला होता. शुक्रवारी तारीख 21 रात्री अकरा वाजायच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली पहाटेपर्यंत जिल्ह्यात कमी अधिक पाऊस पडत होता धारूर महसूल मंडळात सर्वाधिक 49 मीमी तर त्याखालोखाल बीड महसूल मंडळात 40मिमी एवढा पाऊस झाला शिरूर कासार आष्टी पाटोदा तालुका मात्र कोरडे गेले आहे सरासरी 9.4 मी एवढा पावसाची नोंद झाली आहे धारूर व बीड परिसरात नद्या डोळ्यातून पाणी वाहिले आहे दरम्यान पावसाच्या हजेरीने शेतकरी काही प्रमाणात सुखावला असून पेरणीची लगबग होताना दिसत आहे. कृषी निविष्ठांच्या दुकानात सकाळपासून शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News