रेल्वेभरतीमध्ये ९ हजार जागा; महिलांसाठी ५०% जागा 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 29 June 2019
  • याबाबत घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत केली आहे.
  • या संदर्भात त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. 

नवी दिल्ली : रेल्वेमध्ये विविध पदांसाठी नुकतीच भरती करण्यात आली. यापुढे देखील भरती निघणार आहे. यामध्ये रेल्वेमध्ये ९ हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती हवालदार आणि पोलीस उपनिरीक्षक या पदांसाठी असणार आहे.

यामध्ये महिलांना ५० टक्के जागा देण्यात येणार असल्याचे रेल्वेमंत्री यांनी सांगितली आहे. याबाबत घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत केली आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटरवरून माहिती दिली आहे. 

रेल्वेत ९ हजार पदांची भरती करण्यात येणार असून त्यात महिलांना ५० टक्के संधी देण्यात येणार आहे. २०१९-२०२१ पर्यंत १० टक्के आरक्षणअंतर्गत ४ लाखांहून अधिक लोकांना रोजगार देण्याच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली होती.

 

त्यावेळी ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असं सांगण्यात आलं होतं. आता या प्रक्रियेने वेग घेतला आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News