९४ शाळांचे विद्यार्थी गळक्‍या खोलीत बसणार

सयाजी शेळके
Saturday, 8 June 2019
  • जिल्ह्यातील ९४ शाळांची दुरवस्था कायम; केवळ ३२ इमारतींची दुरुस्ती  

उस्मानाबाद -  जिल्ह्यातील १२६ शाळांच्या दुरुस्तीपैकी केवळ ३२ शाळांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. उर्वरित ९४ शाळांची दुरुस्ती केव्हा होणार, पावसाळ्यात शाळांची गळती बंद होणार का, यंदाही गळक्‍या वर्गखोल्यांतूनच विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागणार का, असे प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. 

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक स्तरावर शिक्षणाची सोय व्हावी यासाठी जिल्हा परिषदेने संपूर्ण  यंदाही गळक्‍या वर्गखोल्यातूनच शिक्षण जिल्ह्यात शाळांचे जाळे तयार केले आहे.

अनेक वर्षांपूर्वी शाळांचे बांधकाम झाल्याने प्रत्येक वर्षी शाळांच्या दुरुस्तीवर मोठा निधी खर्च होतो. यंदाच्या २०१८-१९ वर्षात जिल्ह्यात शाळा दुरुस्तीची १२६ कामे हाती घेण्यात आली. यापैकी केवळ ३२ कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. दरम्यान, गेले आर्थिक वर्ष संपताच आचारसंहिता लागणार होती.

त्यामुळे आचारसंहितेपूर्वीच कामे सुरू होणे अपेक्षित होते; मात्र या- ना त्या कारणाने अनेक कामे आचारसंहिता संपल्यानंतर सुरू झाली. त्यामुळे कामे पूर्ण होऊ शकली नाहीत. शिवाय २०१७-१८ वर्षात शाळा दुरुस्तीची ८४ कामे होती. त्यापैकी ६३ शाळांची दुरुस्ती पूर्ण झाली; तर गेल्या दोन वर्षांपासून २१ कामे अद्यापही प्रगतिपथावरच असल्याचे दिसत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News