८० टक्के मुंबई खड्यांतून बाहेर, महानगरपालिकेचा दावा!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 11 July 2019

पालिकेच्या ट्विटर हॅण्डलवर  खड्ड्याचे छायाचित्र टाकल्यास तो तातडीने बुजवला जाईल, असे पालिकेने जाहीर केले आहे. 

मुंबई : मुंबईतील अनेक रस्त्यांची अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असताना ८० टक्के खड्डे भरल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

त्यामुळे पुन्हा ‘खड्डेवाद’ निर्माण होण्याची शक्‍यता आहे. खड्ड्यांबाबत ट्विटरवर तक्रारी करण्याची सुविधाच उपलब्ध नसल्याची टीका स्थायी समितीत करण्यात आली. 

पालिकेच्या ट्विटर हॅण्डलवर  खड्ड्याचे छायाचित्र टाकल्यास तो तातडीने बुजवला जाईल, असे पालिकेने जाहीर केले होते. त्याबाबतचे आदेश सर्व विभाग कार्यालयांना देण्यात येतील, असे आश्‍वासन पालिका प्रशासनाने दिले होते; मात्र तसे न झाल्याने बुधवारी स्थायी समितीत नगरसेवकांनी या निर्णयाची खिल्ली उडवली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News