खेळणी विकून मिळवले ६२ टक्के गुण

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • सण, उत्सव, यात्रा काळात रस्त्यावर लहान मुलांची खेळणी विक्री करणाऱ्या सलीम शेख यांच्या सकलेन याने दहावी परीक्षेत ६२ टक्के गुण मिळविले.

सातारा - सण, उत्सव, यात्रा काळात रस्त्यावर लहान मुलांची खेळणी विक्री करणाऱ्या सलीम शेख यांच्या सकलेन याने दहावी परीक्षेत ६२ टक्के गुण मिळविले. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेनेे शेख यांनी मुलास कोणता हि क्लास लावला नाही. सातारा तालुक्यातील वर्ये येथील जयसिंगराव करपे हायस्कुलमध्ये शिक्षण घेणाऱ्या सकलेन याने आपल्या आई आणि वडील यांना व्यवसायात मदत करून अभ्यास केला. पाच तास अभ्यास करून हे यश मिळविल्याचे त्याने सांगितले. आयटीआयचे शिक्षण घेणार असल्याचे त्याने नमूद केले.

रबिया आणि सलीम शेख यांनी मुलाने जिद्दीने अभ्यास केला. आम्ही १५ वर्ष साताराच्या रस्त्यावर चक्र, गदा, तलवार, धनुष्यबाण अशी लहान मुलांची खेळणी विक्री करीत आहोत. आम्हांला सकलेनने व्यवसायात मदत करून अभ्यास केल्याचा आनंद वाटतो. त्याला मित्रांनी आणि मैत्रिणीने अभ्यासात मदत केली. आयटीआयचा कोर्स करणयाची त्याची इच्छा आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News