5 फेब्रूवारीला कळणार! पांड्या कार्तिक खेळणार?

यिनबझ टीम
Thursday, 24 January 2019

दिल्ली : भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सलामीवीर लोकेश राहुल यांचा क्रिकेटमधील भविष्याबाबतचा निर्णय आता सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे. येत्या पाच फेब्रुवारीला त्या दोघांवरही सुनावणी होणार आहे. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून सुरु असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता निमार्ण झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने कॉफी विथ करण या कार्यक्रमात झालेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तपास समितीची स्थापना केली. त्यामुळे हार्दिक आणि राहुल यांच्या कराराच्या श्रेणीवर गदा येण्याची शक्यता आहे. 

अखेर सर्वोच्च न्यायलयाने त्यांच्या सुनावणीची तारिख जाहीर केली आहे. त्यांच्यावरील सुनावणी पाच फेब्रुवारीला केली जाणार असल्याने आणखी काही दिवस त्यांना क्रिकेटपासून लांब राहावे लागणार आहे. तसेच त्यांच्यावरील कारवाई लांबल्यास दोघांनाही मार्च महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएल आणि जून महिन्यात होणाऱ्या विश्वकरंडकासही मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News