राज्यात अभियांत्रिकीच्या 50 हजार विद्यार्थ्यांना ‘कॉम्प्युटर’ला प्रवेश हवा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 31 July 2019

राज्यात प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी १ लाख ३५ हजार जागा आहेत. ८९ हजार विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीसाठी विकल्प अर्ज (ऑप्शन फॉर्म) भरले. यंदा बहुतांश विद्यार्थ्यांना कम्प्युटर शाखेलाच प्रवेश मिळावा, अशी अपेक्षा होती. त्यांनी प्रवेशाच्या दोन्ही फेऱ्यांत कम्प्युटर शाखेलाच पसंती दिली. पण जागा  कमी,  मागणी जास्त राहिल्याने ७० टक्केपेक्षा जास्ती  गुण असलेल्या विद्यार्थ्यांना कम्प्युटर शाखेला प्रवेश मिळाला.

त्यामुळे केवळ मोजक्‍याच जागा शिल्लक आहेत. परिणामी ५५ हजार विद्यार्थ्यांना अन्य ब्रॅंचला पसंती द्यावीच लागेल. अन्यथा प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडावे लागेल. अशा विद्यार्थ्यांना संस्थास्तरावर जागा शिल्लक असल्यास प्रवेश मिळू शकतो. पण कोणतीही स्कॉलरशिप मिळत नाही. उलट पूर्ण फी तर भरावी  लागेल. अन्य अतिरिक्त आर्थिक मागणी(डोनेशन)ला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ कम्प्युटर शाखेची पसंती न देता अन्य इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्‍ट्रॉनिक्‍स शाखांला पसंती दिल्यास उर्वरित सर्व विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकीला प्रवेश  मिळेल हे निश्‍चित. त्यासाठी उद्या (ता. ३१) पर्यंत विकल्प अर्ज (ऑप्शन फॉर्म) भरण्याची मुदत आहे.
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News