अकोल्यातील चक्क ‘एमपीएससी’च्या परीक्षेला ४४४ परीक्षार्थींची दांडी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवारी (ता. १६) महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९चे आयाेजन करण्यात आले.

अकोला - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) रविवारी (ता. १६) महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०१९चे आयाेजन करण्यात आले. शहरातील १२ परीक्षा केंद्रांवर सकाळी ११ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सदर परीक्षा घेण्यात आली.

परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थ्यांपैकी ४४४ परीक्षार्थ्यांनी दांडी मारली, तर दोन हजार ९१९ परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित होते. परीक्षा नियंत्रक म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी लठाड यांची तर १६५ समवेक्षक, ५० पर्यवेक्षक, १२ केंद्र प्रमुख व तीन समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News