‘जर्सी’ साठी ४० कोटींचा मागणी

आरती औटी,(यीनबझ)
Friday, 26 July 2019

कबीर सिंगनंतर बॅालीवुड मध्ये नाव उंचावल्यावर शाहिदच्या मानधनात वाढ झाली असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं.

शाहिद कपूरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला तो म्हणजे बॅाक्सऑफीसवर गाजलेला ‘कबीर सिंग’ हा चित्रपट. या चित्रपटातील त्याची भुमीका प्रेक्षकांना भारावुन टाकणारी होती. चित्रपट समीक्षक, सिनेरसिका या चित्रपटासह शाहिदच्या कामाचे तोंडभरून कौतुक करताना दिसतात. आता शाहिदला आणखी एका तेलुगु चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी विचारणा करण्यात आली आहे.  ‘जर्सी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यासाठी शाहिदच्या नावाचा विचार केला जात आहे.  

कबीर सिंगनंतर बॅालीवुड मध्ये नाव उंचावल्यावर शाहिदच्या मानधनात वाढ झाली असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. आता शाहिदला अनेक चित्रपटांसाठी मागण्या येत आहेत. नुकत्याच ‘जर्सी’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी शाहिदने चक्क ४० कोटी रुपयांची मागणी केली आहे. हा चित्रपट एका क्रिकेटपटूच्या जीवनावर आधारित आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News