मुंबईत ४ मजली इमारत कोसळली; ४० ते ५० जण अडकल्याची भीती 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 16 July 2019
  • डोंगरी परिसरातील ही इमारत अनेक वर्षे जुनी होती.
  • यामध्ये जवळपास १५ कुटुंबीय वास्तव्यास होते.
  • नेमकी ही इमारत कशामुळे कोसळली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.

मुंबई: मुंबईत इमारत कोसळण्याचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. मुंबईतील डोंगरी भागातील केसरभाई ही चार माजली इमारत कोसळली आहे.

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्ब्ल ४० ते ५० जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. सध्या अग्निशमन दलाचे जवान हे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच एनडीआरएफच्या तुकडीलाही टीमला पाचारण करण्यात आलं आहे. 

 

डोंगरी परिसरातील ही इमारत अनेक वर्षे जुनी होती. यामध्ये जवळपास १५ कुटुंबीय वास्तव्यास होते. नेमकी ही इमारत कशामुळे कोसळली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही.

अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.डोंगरी परिसरात अनेक इमारती या दाटीवाटीने बांधण्यात आल्या आहेत. यामुळे मदत कार्यात सध्या बऱ्याच अडचणी येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी बचाव कार्यास सुरुवात केली. सध्या बचावकार्य सुरु असून बघ्यांची गर्दी देखील वाढली आहे.  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News