यवतमाळ जिल्ह्यातील 390 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; जि. प. अधिकार्‍यांचे दुर्लक्ष

समीर मगरे 
Monday, 1 July 2019
  • जिल्हा परिषदेतंर्गत ग्रामीण भागत सुरू असलेल्या शाळांपैकी 390 शाळांना दुरुस्तीची प्रतीक्षा आहे.
  • त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनाकरिता जीव मुठीत घेऊन बसावे लागत आहे.

यवतमाळ: नवीन शैक्षणिक सत्राला बुधवारी (ता.26)ला सुरवात झाली आहे. शाळेच्या पहिल्यादिवसी विद्यार्थ्यांचे शिक्षण विभागाकडून जंगी स्वागत करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी ढोल ताशाच्या गजरात व पुष्पगुच्छ देवून विद्यार्थ्याचे स्वागत केले. 

आजघडीला जिल्हा परिषदेतंर्गत ग्रामीण भागत सुरू असलेल्या शाळांपैकी 390 शाळांना दुरुस्तीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापनाकरिता जीव मुठीत घेऊन बसावे लागत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचा विडा प्राथमिक शिक्षण विभागाने उचला आहे. 

विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे याकरिता शासनाच्यातर्फे लाखो रुपये खर्च केला जात असतांना जिल्हा परिषदेच्या 390 शाळेची दुरुस्तीचा प्रस्ताव शासनस्तरावर धुळखात आहे. या शाळा दुरुस्तीकरिता शासनाकडून गेल्यावर्षी जवळपास एक कोरड रुपये आले होते. तर नवीन वर्गखोली बांधकामसाठी जवळपास दोन कोरड रुपये आले आहे. 

प्राथमिक शिक्षण विभागाने शाळा दुरुस्तीचा निधी जिल्ह्यातील सोळा पंचायत समितीस्तरावर पाठविला आहे. तरी देखील पंचायत समितीस्तरावरुन अद्यापही या शाळेची दुरुस्तीपूर्ण झाली नाही. परिणामी विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला समोर जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देवून शाळा दुरुस्तीचे काम तत्काळपूर्ण करावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. 

पंचायत समिती      शाळेची संख्या
आर्णी                        21
बाभूळगाव                  13
दारव्हा                       35
दिग्रस                        29
घाटंजी                       32
कळंब                        15
महागाव                     58
मारेगाव                     11
नेर                           17
पांढरकवडा                 27
पुसद                         25
राळेगाव                     8
उमरखेड                    26
वणी                         27
यवतमाळ                  46

एकूण                       390 
 

पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष 
जिल्हा परिषदेच्या 390 शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असताना जिल्हा परिषदेचे पदाधिकार्‍यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्यातरी जिल्ह्यात दिसून येत आहे. त्यामुळे या शैक्षणिक वर्षात तरी पदाधिकारी लक्ष देवून शाळा दुरुस्ती करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News