३१ डिसेंबरच्या पार्ट्या आणि मतिमंद मुलं

मयुरी फडतरे, सातारा
Saturday, 26 January 2019

३१ डिसेंम्बर म्हणजे पार्टी, फुल्ल धम्माल हीच संकल्पना असते, मात्र समाजात असे काही घटक आहेत, ज्यांना आपल्या प्रेमाची आणि थोड्याफार मदतीची गरज असते. पार्टीसाठी पैसे वाया घालवण्यापेक्षा एखाद्याला मदत करू हाच विचार आमचे मित्र निखिल यांनी सगळ्यांसमोर मांडला. सगळयांनी क्षणाचाही अवधी न घेता त्याला होकार दिला. ३१ डिसेंबरचे औचित्य साधून आम्ही सगळेजण सातारा पासून जवळच असलेल्या शेंद्रे (ता. जि. सातारा) येथील एहसास मतिमंद मुलांचे बालगृह येथे जाऊन पोहोचलो.

पाहिल्यावर्षी त्यांना फळांचे वाटप केले, तसेच त्यावेळी त्यांना एवढ्या मुलांच्या स्वच्छतेसाठी टॉवेलची गरज होती म्हणून मग त्यांना त्याची पूर्तता केली. दुसर्यावर्षी त्यांची आर्थिक नड काही प्रमाणात कमी करण्याचा छोटासा प्रयत्न केला. यावर्षी आमचे हे तिसरे वर्ष, संदीप कांबळे हे एहसासचे सगळे कामकाज पाहतात. त्यांना फोन केला की या युवकांनी मदत करू शकतो, म्हणून मग त्यांनी सुचवले, यावर्षी किराणा मालाची कमतरता आहे. मग त्यातही यांनी खारीचा वाटा उचलन्याचा प्रयत्न केला.

खरंतर पार्ट्या करण्यापेक्षा या छोट्या मुलांसोबत आनंद वाटल्यानंतर जे समाधान मिळतं, ते जगाच्या पाठीवर कुठेही मिळु शकत नाही. आपल्या एका मिठीने ही छोटी छोटी मूल खूप खूष होऊन जातात. त्यांच्या सोबत वेळ घालवणं म्हणजे एक समाधान, आनंद, कठीण परिस्थितीतही कसे जगावे, याची ऊर्जा देणारे ठरते. एक वेगळीच रिफ्रेशमेन्ट होते. असे या तरुणाईला वाटते. तिथे त्या मुलांची काळजी घेणारा स्टाफ हा खूप ग्रेटच आहे, कारण एवढ्या सगळ्या मुलांना ते आपल्याच मुलांप्रमाणे सांभाळतात. कधीही न चिडता, नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवून आणि या कामासाठी त्यांना ज्याचा मोबदला मिळेलच असही नाही, तरीही ते आनंदाने हे काम करतात. एहसास मतिमंद मुलांच्या रहिवासी बालगृहाचे संस्थापक संदिप कांबळे तसेच तेथील पूर्ण स्टाफला व त्यांच्या कामाला आम्हा सर्वांचा सलाम...!!!

यांनी केला हा उपक्रम
मयुरी फडतरे
निखिल पवार
अश्विनी सोनवणे
अक्षय शिंदे 
शिवम महापरळे
कौस्तुभ भोसले
प्रियांका पवार 
ज्योत्स्ना पिंपळे
सुप्रिया पोतेकर
पूजा चव्हाण
सोनाली चव्हाण

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News