सिपेटमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यास 30 जुनपर्यंत संधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • प्लॅस्टिक इंजिनिअरींग आणि टेक्‍नोलॉजीमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना "सिपेट'मध्ये प्रवेश घेण्याची संधी आहे.
  • तसेच सीपेट सीबीटी-जेईई होणार 7 जुलैला होणार आहे.
  • हा दीड वर्षाचा कोर्स असून त्यासाठी केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यालाच प्रवेश घेता येतो.

औरंगाबाद: प्लॅस्टिक इंजिनिअरींग आणि टेक्‍नोलॉजीमध्ये करिअर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना "सिपेट'मध्ये प्रवेश घेण्याची संधी आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली असून 30 जुन पर्यंत अर्ज करता येणार आहे. तसेच सीपेट सीबीटी-जेईई होणार 7 जुलैला होणार आहे. सायन्स, इंजिनिअरींग, आयटीआय, बारावी, दहावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील. 

औरंगाबाद सिपेटमध्ये वेगवेगळे कोर्सेस सुरु आहेत. यात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऍण्ड टेस्टिंग (पीजीडी-पीपीटी) हा दीड वर्षाचा कोर्स असून त्यासाठी केमिस्ट्रीच्या विद्यार्थ्यालाच प्रवेश घेता येतो. त्यासाठी 120 प्रवेश क्षमता आहे. पोस्ट डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड डिझाईन विथ कॅड/कॅम (पीडी-पीएमडी विथ कॅड/कॅक) साठी केवळ 60 प्रवेश क्षमता असून तोही दीड वर्षाच्या कालावधीचा आहे. यात तीन वर्षाचा मेकॅनिकल, प्लॅस्टिक टेक्‍नॉलॉजी, टुल ऍण्ड डाय मेकिंग, प्लॅस्टिक, प्रॉडक्‍शन इंजिनिअरींग, आटोमोबाईलस्‌, मेकॅट्रॉनिक्‍स्‌, सीपेट डीपीएमटी या दर्जाचे तीन वर्षाचे डिप्लोमाधारक पात्र आहेत. 

डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी (डीपीएमटी) आणि डिप्लोमा इन प्लॅस्टिक टेक्‍नॉलॉजी (डीपीटी) हे दोन्ही कोर्स तीन वर्षाचे असून दहावी आणि बारावीचे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. त्यासाठी इंग्रजी, गणित, विज्ञान हे विषय आवश्‍यक आहेत. वरील सर्व कोर्सेससाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 30 जुन आहे. विद्यार्थ्यांची 7 जुलैला सीपेट सीबीटी-जेईई होणार आहे. ऑनलाईन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी https://eadmission.cipet.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन सिपेटतर्फे करण्यात आले. 

थेट दुसऱ्या वर्षालाही प्रवेश 
डीपीएमटी आणि डीपीटी हे दोन्ही कोर्सला थेट दुसऱ्या वर्षासाठी ऑफलाईन नोंदणी करता येईल. त्यासाठी विद्यार्थी पीसीएम ग्रुपमधून बारावी उत्तीर्ण हवा. तसेच दहावीनंतर जनरल मशिनिस्ट, ड्राप्समन मेकॅनिकल, फिटिंग, प्लॅस्टिक, पॉलिमर, केमिकलमध्ये आयटीआय पुर्ण करणारे विद्यार्थी यासाठी पात्र आहेत. यासाठी 22 जुनपर्यंत नोंदणी करता येणार आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News