पुण्यातील २८ वर्षीय तरुण काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून ते पद रिकामं असल्याने पुण्यातील एका  28 वर्षीय इंजिनिअर तरुणाने थेट काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. गजानंद होसाळे (Gajanand Hosale) असं या तरुणाचं नाव आहे.

पुणे : राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून ते पद रिकामं असल्याने पुण्यातील एका  28 वर्षीय इंजिनिअर तरुणाने थेट काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. गजानंद होसाळे (Gajanand Hosale) असं या तरुणाचं नाव आहे. गजानंद उद्या काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्याकडे आपला अर्ज देणार आहे. गजानंद अद्याप काँग्रेसचा प्राथमिक सदस्यही नाही. मात्र लवकरच तो ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे. काँग्रेसला तरुण नेतृत्वाची गरज आहे, त्यामुळे मी अध्यक्षपदासाठी अर्ज भरणार असल्याचं गजानंदने म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल गांधींनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. प्रचंड विरोधानंतरही राहुल गांधी आपल्या पद सोडण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. इतकेच नाही तर त्यांनी तातडीने नवा अध्यक्ष नेमण्याचीही विनंती पक्षाला केली. या सर्व पार्श्वभूमीनंतर पुण्यातील गजानंद होसाळे या इंजिनिअरने काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे. 

गजानंद हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असून, त्याला काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) जबाबदारी सांभाळायची आहे. गजानंद होसाळे सध्या एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या विचारांच्या समन्वयाने देशाची वाटचाल करण्याचा त्याचा मानस आहे.

राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे अध्यक्षपदी कोणाची निवड करायची या संभ्रमावस्थेत सध्या काँग्रेस आहे. त्यामुळेच मी काँग्रेस अध्यक्षपदासाठी अर्ज करणार आहे, असं गजानंदने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News