औरंगाबादेतील एमआयटी इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या 24 विद्यार्थ्यांची निवड

अतुल पाटील
Sunday, 14 July 2019

एमआयटी अभियांत्रिकीच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागातील 24 विद्यार्थ्यांची इन-प्लांट ट्रेनिंगमधून नामांकित कंपन्यामध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. 

औरंगाबाद : एमआयटी अभियांत्रिकीच्या इलेक्‍ट्रॉनिक्‍स विभागातील 24 विद्यार्थ्यांची इन-प्लांट ट्रेनिंगमधून नामांकित कंपन्यामध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. 

संस्थेच्या बी. टेक अभ्यासक्रमात शेवटच्या सत्रामध्ये इन-प्लांट ट्रेनिंगसाठी विद्यार्थ्याना कंपनीमध्ये सहा महिने प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले होते. यातून टाटा कम्युनिकेशन पुणे येथे मानसी जगदाळे, रसिका देशमुख, निकिता भागवत, शुभम बुंदेले, सीमा हेडगिरे, वैभवी देशपांडे, प्रीती जोशी, मनीषा गोरे, स्नेहा जाधव, माधुरी काथार, पूजा ढगे, लक्ष्मीकांत लिंगमपल्ले यांची निवड झाली आहे. 

ग्राइंड मास्टर प्रायव्हेट लिमिटेड येथे पूजा थोटे. इन्क्रिपे टेक्‍नॉलॉजी प्रायवेट लिमिटेड नाशिक येथे श्रेयस लंकेपिल्लेवार. सायटेक सोल्युशन प्रायवेट लिमिटेड पुणे येथे अंजु दहीले, प्रियांका जाधव. ओ.एस. इन्फोटेकमध्ये रितू अडागळे, सुहास अनावणे. जी.एच. टेक्‍नो वर्ल्ड सर्व्हिसेस औरंगाबाद येथे रुपेश बागुल, सिद्धार्थ काळंगे. ऍटलास कॉर्पो लिमिटेड पुणे येथे सौरभ हरणे. 

ऑल वेव्ह एव्ही सिस्टिम प्रायव्हेट लिमिटेड मुंबई येथे आशुतोष शुक्‍ला. प्रोसेस ऑटोमेशन लिमिटेड औरंगाबाद येथे प्रदीप आंबटवार. रॅडप्रो सेल्स अँड सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड पुणे येथे सचिन कांगणे या विद्यार्थ्यांची निवड झाली. एमआयटी समूहाचे महासंचालक प्रा. मुनीश शर्मा यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. संतोष भोसले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास इलेक्‍ट्रॉनिक्‍स अँड टेलिकमुनिकेशन विभागाचे विभागप्रमुख डॉ. गणेश साबळे, इन-प्लांट ट्रेनिंग इन्चार्ज प्रा. अमोल पाटील, प्रा. विनोद पुरी गोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News