‘नटराज नृत्य’च्या विद्यार्थिनींना नृत्य स्पर्धेत २४ पारितोषिके

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणेतर्फे २५ ते २७ मे दरम्यान १५व्या ‘कल्चरल फोरम ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌’च्या भारत सीझन दोन २०१९ या शीर्षकांतर्गत पुणे येथील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन आणि टिळक स्मारक मंदिरात स्पर्धा घेण्यात आल्या.

सोलापूर - अखिल भारतीय सांस्कृतिक संघ, पुणेतर्फे २५ ते २७ मे दरम्यान १५व्या ‘कल्चरल फोरम ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌’च्या भारत सीझन दोन २०१९ या शीर्षकांतर्गत पुणे येथील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन आणि टिळक स्मारक मंदिरात स्पर्धा घेण्यात आल्या.

यात सोलापुरातील नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या २७ पैकी २४ सादरीकरणांना पारितोषिके बक्षिसे मिळाली.विविध राज्यांतून सादर करण्यात आलेल्या दोन हजार कला प्रकारांतून सोलापूरच्या स्पर्धकांनी भरतनाट्यम ११ सोलो, सहा ड्युएट, दोन ट्रायो आणि सहा सांघिक प्रकारांत बक्षिसे मिळविली. विद्यालयातील ७० विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळविले.

सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेसाठी २४ नृत्यांची निवड झाली आहे. उत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक म्हणून लतिका गड्डम हिचा सत्कार करण्यात आला. सहा समूह नृत्यात दोन प्रथम, एक द्वितीय, एक तृतीय व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News