तारुण्यात जाणाऱ्या मुलांसाठी  "@ २०"

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

प्रकाशक - सकाळ प्रकाशन 
लेखक : डॉ. श्रुती पानसे 
पुस्तकाचे नाव -  @ २० 
ISBN - 978-93-87408-67-8
किंमत - रु.१२५ 
पृष्ठे - १०४
आकार - ५.५"x ८.५"
श्रेणी - व्यक्तिमत्त्व विकास 

पुस्तकाविषयी
किशोरावस्थेकडून तारुण्याकडे जाणाऱ्या मुलांसाठी हे मार्गदर्शनपर पुस्तक आहे. या वयातील मुलांना शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, नातेसंबंध अशा विविध विषयाबाबतीत संभ्रम असतो. नेमकी कोणती वाट निवडू, ज्याने आयुष्यात यश मिळेल, हा एकच विचार त्यांना अस्वस्थ करतो. अशावेळी मुलांनी आपला प्राधान्यक्रम कसा ठरवावा, मुळात अशी संभ्रमावस्था या वयात का निर्माण होते, मोह आणि कर्तव्य यांमध्ये समतोल कसा साधायचा, अशा महत्वपूर्ण विषयांबाबतची मनमोकळी चर्चा या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.   

लेखक परिचय 
मानसोपचार तज्ज्ञ. बालमानसशास्त्र, मेंदू विकास आणि शिक्षण या विषयातील तज्ज्ञ.  विविध वर्तमानपत्रांमधून मानसशास्त्रीय चिकित्सा करणारे सदरलेखन.  आजवर १२ पुस्तके प्रकाशित.   

पुस्तक खरेदीसाठी संपर्क - सकाळ प्रकाशन, ५९५, बुधवार पेठ, पुणे २. आनंद शिंदे दूरभाष - 981736015. ई-मेल - anand.shinde@esakal.com
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News