यांनी रोखले दोन बालविवाह (पाहा हा व्हीडिओ)

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • आज दुपारी दोन बालविवाह होत असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी यांना मिळाली.  
  • त्यांच्या वयाचे पुरावे न मिळाल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

(व्हीडिओ:प्रमोद इंगळे)

सातारा: पासून जवळच असलेल्या मोळाचा ओढा येथील निकी बंडस मंगल कार्यालयात दोन जोडप्यांचा बालविवाह होत असल्याची माहिती महिला व बाल विकास अधिकारी यांना मिळाली. 

त्यांनी पोलीस व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आज दुपारी हे दोन बाल विवाह रोखले. त्यांच्या वयाचे पुरावे न मिळाल्याने त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांचे त्यातून वयोमान तपासले जाणार आहे. 

दोन मुली व एका मुलाचे वय अनुक्रमे 18 व 21 पेक्षा कमी असल्याची माहिती महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात आली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News