महाराष्ट्राच्या राजकारणात कटप्पा आणि बाहूबलीची एंट्री

यिनबझ टीम
Monday, 11 November 2019

राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधून शिवसेना बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात मिम्स व्हायरल होऊ लागलेत.

मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) मधून शिवसेना बाहेर पडल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात मिम्स व्हायरल होऊ लागलेत. शिवसेनेने भाजपासोबतची युती सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत मिळून सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आणि शिवसेनेला ट्रोल करण्यास सुरूवात केली. हे मिम्स ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर भाजप समर्थकांकडून व्हायरल केल्याचे दिसून येतेय.

 

काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली' या चित्रपटात कटप्पा आपल्या मानलेल्या भाच्याच्या म्हणजेच बाहूबलीच्या पाठीत तलवार खुपसतो आणि त्याचा खूण करतो, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खूपसून उध्दव ठाकरेंनी धोका दिला असल्याचे व्यंग चित्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे बाहुबली आणि उद्धव ठाकरे हे कटप्पा असल्याचे दाखविण्यात आले आहे.

इतकेच नाही तर बाळ ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओदेखील सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबत आपली भूमिका सांगत एका टीव्ही मुलाखतीत म्हणाले आहेत की, जर आपण शरद पवार आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर सरकार स्थापन केले तर जनता आम्हाला माफ करणार नाही.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News