viral video शरद पवार आणि आमच्यात हाडवैर नव्हतच कधी

यिनबझ टीम
Monday, 11 November 2019

मुंबई - गेल्या 15 दिवसांपासून 14 व्या विधान सभेच्या सत्ता स्थापनेवरून संघर्ष सुरू असताना युतीतून निवडणुक लढलेल्या भाजपा-शिवसेनेचे वारे फिरल्याचे आजच्या राजकारणावरून स्पष्ट झाले आहे. केंद्रातून शिवसेनेचा एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनी माघार घेत शिवसेना आणि युती तुटल्याचे संकेत दिल्याचे चित्रही पाहायाल मिळतेय, ही सगळी रनधुमाळी सुरू असताना बाळासाहेब ठाकरेंचीही आठवण सोशल मीडियाच्या माध्यमातून केली जातेय. त्यांचा एक व्हिडीओही सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

भाजप आणि सेनेच्या युतीत खोट आल्याने सेनेने राष्ट्रवादी  कॉंग्रेस आणि कॉंग्रेसची वाट धरल्याचे चित्र स्पष्ट आहे. कॉंग्रेसच्या अटीनुसार केंद्रात असलेल्या अरविंद सावंत यांनादेखील मातोश्रीवरून राजीनाम्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे खूप वर्षानंतरच्या अंतराने राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याचे चित्र समोर आले आहे.

मुंबई येथे एका बायोग्राफी सोहळ्यानिमित्त झालेल्या उद्घाटन प्रसंगी भाषण करत असताना दिवगंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांसोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला होता. "आमचं त्यांचं हाडवैर नव्हत हो कधी" अशा शब्दात शरद पवारांसोबतच्या असलेल्या नात्याचा त्यांनी उल्लेख केला होता.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News