सेनेचे रंगशारदात, भाजपाचे मुंबईत तर कॉंग्रेसचे आमदार जयपूरला रवाना

यिनबझ टीम
Friday, 8 November 2019

बहुमत सिध्द करताना इतर पक्षांचे आमदार फुटू नये या भितीने शिवसेना, कॉंग्रेसने आपल्या आमदारांना तटबंधीत ठेवल्याचे दिसून येत आहे.

मुंबई - 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी काही तास उरले असतानाच 14 व्या विधान सभेच्या तयारीला वेग आल्याचे चित्र राज्यभर पसरत आहे. राज्यात गेले 15 दिवस सत्ता स्थापनेला घेऊन मोठा गाजावाजा होत आहे. राष्ट्रपती राजवट लागण्याआधी बहुमत सिध्द करण्यासाठी भाजपा प्रयत्नशिल आहे, मात्र बहुमत सिध्द करताना इतर पक्षांचे आमदार फुटू नये या भितीने शिवसेना, कॉंग्रेसने आपल्या आमदारांना तटबंधीत ठेवल्याचे दिसून येत आहे.

सत्ता स्थापनेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या गडबडीत विरोधी पक्षांच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, या भितीने शिवसेनेने आपले आमदार रंगशारदात, भाजपाने आमदारांची मिटींग घेण्याच्या उद्देशाने मुंबईत तर कॉंग्रेसने आपले आमदार फुटू नयेत या भितीने सर्व आमदारांना जयपूरला रवाना केले असल्याची माहिती समोर येत आहे.

बहुमत मिळालेल्या भाजपाने अजून सत्ता स्थापनेचा दावा केला नसल्याने आणि शिवसेना आपल्या अटींवर ठाम असल्याने सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. यातच कॉंग्रेसला आपले आमदार फुटण्याची मोठी भिती असल्याने काही आमदारांची राजस्थानातल्या एका सुरक्षित ठिकाणी रवानगी केली असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

भाजपा पक्षातले बडे नेते आमच्या अनेक आमदारांशी निवडणुकी आधी आणि निवडणुकीनंतरही संपर्क करत आहेत. साम, दाम, धंड भेद अशा अनेक उपायांचा वापर करत निवडणूकच्या आधीपासूनच भाजपा लोकांना जमा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचे सर्वात जास्त नुकसान कॉ़ंग्रेसला झाले असल्याने आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News