वाढदिवशी केक कापायला गेलेल्या मित्रांनी केला 'तिच्यावर' सामूहिक बलात्कार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 4 August 2019

मुंबईतील चुनाभट्टी येथे वाढदिवसाच्या दिवशी एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुद्द पिडीत मुलीने चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली असल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीची प्रकृती स्थिर आहे. तिला औरंगाबादमधल्या बेगमपूर येथे असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीला एकापेक्षा जास्त जखमा झाल्याने ती बोलण्याच्या स्थितीत नाही. 

बेगमपूरा येथील पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैमध्ये ही मुलगी औरंगाबादहुन मुंबईत आली होती. तिच्या चार मित्रांनी तिचा वाढदिवस घरी साजरा करण्याचे ठरवले. केक कापल्यानंतर चारही आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला. नंतर, ती औरंगाबाद येथे घरी परतली परंतु तीने पोलिसांना किंवा पालकांना घडलेल्या घटनेची काहीच माहिती दिली नाही.

२४ जुलै रोजी तिच्या खाजगी जागी वेदना झाल्यामुळे तिला औरंगाबाद येथील शहर-रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर बलात्कार झाल्याचे डॉक्टरांना संशय आला आणि डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. 

३० जुलै रोजी तिने तिच्या वडिलांना सगळा प्रसंग सांगितला. तिच्या वडिलांनी बेगमपूर पोलिसांना तक्रार दाखल करण्यास भाग पाडले आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु ही घटना मुंबईत घडल्यामुळे बेगमपूर पोलिसांनी हे प्रकरण मुंबईतील चुनाभट्टी पोलिसांनकडे सोपविले आले.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ७ जुलै रोजी घडली, परंतु पीडित मुलीला इतका धक्का बसला की तिने त्याबद्दल कोणालाही सांगितले नाही. परंतु २५ जुलैला तिची प्रकृती चिंताजनक झाल्यावर तिच्या कुटुंबीयांनी तीला औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल केले.

या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News