रोहित पवार - बाळासाहेब असते तर भाजपचं एवढं धाडस झालं असतं का?
मुंबई - सध्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेला घेऊन मोठा गोंधळ सुरू असतानाच विरुध्द पक्षाची भुमिका बजावणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातूनही टिकेची झोड होताना दिसत आहे. त्यातच कर्जत-जामखेड मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवारांनीही आपल्या फेसबूकच्या माध्यमातून भाजपा तसचे शिवसेनेवरही टिका केली आहे.

रोहित पवार म्हणाले...
महाराष्ट्राला आदर वाटण्यासारखे अनेक नेते लाभले आहेत, त्यातलेच एक म्हणजे बाळासाहेब ठाकरे होय, माझ्या मनात बाळासाहेब ठाकरेंविषयी आदर असण्याची अनेक कारणे आहेत, त्यातलं एक म्हणजे देशाच्या राजकारणात त्यांचं असलेलं वजन, आज भाजप पक्ष शिवसेनेला दिलेला शब्द फिरवताना दिसत आहे, यावेळी जर बाळासाहेब ठाकरे असते तर भाजपाने एवढं धाडस केलं असतं का? अशा शब्दांमध्ये रोहित पवारांनी फेसबूक पोस्ट केली आहे. लवकरात लवकर सत्ता स्थापन करून सर्वांनी मिळून जनतेला आधार देण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.