भारतीय महिला आणि पुरूष हॉकी संघांचा दमदार वियज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 2 November 2019

आज भारतीय दोन्ही संघाचा दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. पुरूष संघाचा सामना रशियासोबत तर महिला संघाचा सामना युएसए सोबत होणार आहे.

ओडिसा - भारतीय महिला आणि पुरूष हॉकी संघाने शुक्रवारी झालेल्या ऑलम्पिक पहिल्या क्वालिफायर सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवला आहे. महिला संघाने अमेरिकेला 5-1 ने तर पुरूष संघाने रूसला 4-2 ने हारवत टोकयो 2020 ऑलम्पिकमध्ये क्वालिफायरचा पहिला सामना आपल्या नावावर केला आहे.

ओडिसाच्या कलिंगा स्टेडिअमवर खेळला गेलेल्या सामन्यात भारतीय महिला संघातील 28 व्या मिनिटाला निलिमा मिंजा, 40 व्या मिनिटाला शर्मीला देवी, 42 व्या मिनिटाला गुरजीत कौर, 46 व्या मिनिटाला नवनीत कौर आणि 51 व्या मिनिटाला गुरजीत कौर यांनी अनुक्रमे गोल करत सामना भारताच्या नावावर केला. तर पुरुष संघात 5 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंह, 24 व्या आणि 53 व्या मिनिटाला मनदीप सिंह, आणि 48 व्या मिनिटाला एसवी सुनील यांना गोल करत भारताला विजय मिळवून दिला.

आज भारतीय दोन्ही संघाचा दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. पुरूष संघाचा सामना रशियासोबत तर महिला संघाचा सामना युएसए सोबत होणार आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News