अखेर भाजपाच्या नितेश राणेंनी शिवसेनेच्या सावंताचा पराभव केलाच

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 24 October 2019

कणकवली  -  महाराष्ट्रातली दुसरी सगळ्यात मोठी निवडणूक म्हणून कणकवली मतदार संघाकडे पाहिले जाते. त्यात भाजपाचे उमेदवार नितेश राणे विरुध्द शिवसेनेचे उमेदवार सतिश सावंत उभे होते. यात सतिश सावंत यांचा पराभव करत नितेश राणे यांनी मुसंडी मारली आहे.

कणकवली विधानसभा मतदार संघात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेचे सतीश सावंत उभे होते. नारायण राणे शिवसेनेत असल्यापासुन कणकवली विधानसभा मतदार संघ हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे आणि या ठिकाणी भाजप-शिवसेना युती नसल्याने ही लढत मुख्य मानली जात होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News