18जुलै, मुंबईची लोकल, 16 जणांचा मृत्यू, 13 जण जखमी आणि मुंबईकरांचा धोक्याचा प्रवास

सुरज पाटील
Saturday, 20 July 2019

मुंबई, मुंबईतील लोकांची गर्दी आणि मुंबईची लोकल हे समिकरण अगदी खूप जवळचं आणि मिळतं-जुळतं आहे. मुंबई शहरात नैसर्गिक मृत्यू येण्याचं प्रमाण तसं कमीच असतं. दररोज कोण आणि कशामुळे मृत्यू पावेल हे कधीच सांगता येणार नाही. मुंबईत जितकी पोटा-पाण्यासाठी स्पर्धा चालते तितकीच ती मृत्यूसाठीदेखील असावी. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे.

कुर्ला, ठाणे, डोंबिवली, कल्याण, वाशी, पनवेल, मुंबई सेंट्रल, वांद्रे, बोरिवली, वसई या ठिकाणच्या रेल्वे स्थानकावर हे अपघात झाले असल्याची माहिती आहे. या अपघातांमध्ये रेल्वे रुळ ओलांडताना जास्त अपघात झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातांमध्ये एकूण 16 प्रवाशांचा मृत्यू तर 13 प्रवाशी जखमी झाले आहेत.

जून महिन्यातील 26 तारिख ही मुंबई लोकलसाठी गेल्या काही वर्षांतली सगळ्यात चांगली तारिख मानली जाते, ज्या दिवशी एकही प्रवासी मुंबई लोकलमुळे किंवा रेल्वे ट्रॅक ओलांडताना मृत्यू अखवा जखमी झाला नाही. 

काल झालेल्या अपघातातील 8 प्रवाशांची ओळख पटली असून इतर 8 प्रवाशांची अद्याप कोणतीच ओळख पटली नसल्याची माहिती समोर आली आहे. कालच्या अपघातात कुर्ला - 3, ठाणे - 3, डोंबिवली - 2, कल्याण - 2, वाशी - 1, पनवेल - 1, मुंबई सेंट्रल - 1, वांद्रे - 1, बोरिवली - 1, वसई - 1 अशाप्रकारे प्रवाशांचा मृत्यू जाला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News