१७ वर्षीय तरुणाने केला आंतरराष्ट्रीय स्तरावर १००० किमीचा ट्रेक सर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019

मुंबई : मिठीबाई महाविद्यालयाच्या आर्यन शेठ या विद्यार्थ्याने वयाच्या सतराव्या वर्षीच "सेंट जीआन पीड डे पोर्ट" हे शिखर सर केले आहे. हे शिखर फिनिस्टरे, स्पेनमधील उत्तर पश्चिम किनार्‍यावर वसलेले असून सुमारे १००० किलोमीटर अंतरावर आहे. हा ट्रेल कॅमीनो नावाने ही ओळखला जातो. तर हा रस्ता २००० वर्षापूर्वीचा आहे. तब्बल ४० दिवसांच्या या प्रवासात आर्यन रोज ७ तास चालत असे. स्वतःची बॅगपॅक घेऊन, कधी कधी होस्टेल मधील बंक बेड वर झोपून या पठ्ठ्याने आपला ट्रेक पूर्ण केला.

आर्यनने पीरनीज पर्वत रांगांचा मार्गक्रमण केला. हा मार्ग ३ हजार मीटर उंच असून स्पेनला फ्रांस अणि इतर युरोपीय देशांपासून वेगळा करतो. पीरनीज पर्वतास  मसेटा प्लॅटु  म्हणुनही ओळखले जाते.

आर्यनला ट्रेक करताना द्राक्षमळे, गव्हाची शेती, निलगिरीच्या जंगल अणि हिरव्यागार रानातून सुध्दा जाण्याचा अनुभव आला. आर्यनला सॅंटियागो डे कंपोस्टेला आणि फिनिस्टरे येथे पोहोचल्यावर शासकीय प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी पुरावा म्हणुन पासपोर्टवर दोन पीलग्रीम (यात्रींचा) स्टॅम्प घेणे गरजेचे होते. बहुदा या कठीण मार्गाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रेक करणारा आर्यन सेठ हा पहिला ट्रेकर असावा. 

'ट्रेक सुरु करण्याआधी मी खूप बैचेन होतो की ट्रेक कसा पूर्ण होईल, मी  रोज २५ ते ३० की. मी. चालू शकेल का? मला जमेल का? पण मी मनाशी निश्चिय केला आणि ट्रेकला सुरुवात केली. मी ४० दिवसांचा, १००० की. मी. ट्रेक पूर्ण केला आणि मला खूप आनंद झाला. असाच अनुभव सगळ्यांना मिळो हीच सदिच्छा'. 
- आर्यन शेठ
 
Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News