'या' महापालिकेतील १७ नगरसेवक भाजपमध्ये

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • बहुमताच्या जोरावर थेट सत्तांतर
  • १७ नगरसेवकांना आपल्या जाळ्यात ओढण्यात भाजपला यश ​

नवी दिल्ली : दार्जिलिंग महापालिकेतील १७ नगरसेवकांना आपल्या जाळ्यात ओढण्यात भाजपला यश मिळाले. हा मोठा गट भाजपमध्ये आल्यामुळे केवळ ३२ नगरसेवकांच्या या छोट्या महापालिकेत थेट सत्तांतरच झाले असून, राज्यातील भाजपच्या ताब्यातील ही पहिली महापालिका ठरली आहे.

मात्र, हे सारे नगरसेवक भाजपच्या अपेक्षेनुसार तृणमूल काँग्रेसचे नसून, ते गुरखा जनमुक्ती मोर्चाचे आहेत. लोकसभा निवडणुकीत १७ खासदार निवडून आल्याने एकीकडे भाजप व या पक्षाचे बंगाल प्रभारी कैलास विजयवर्गीय व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे निकटवर्ती मुकूल रॉय यांचा उत्साह ओसंडून वहात आहे.

निवडणुका ज्याप्रमाणे सात टप्प्यांत झाल्या, त्याचप्रमाणे बंगालमधील ‘तृणमूल’ व इतर पक्षांचे आमदार व नगरसेवक सात टप्प्यांत दिल्लीत येऊन भाजपमध्ये सामील होतील, असे विजयवर्गीय यांनी यापूर्वी जाहीर केले होते. त्यातील तिसरा टप्पा आज पार पडला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News