सरकारचा गांधीसाठी १५० कोटींचा निधी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 7 June 2019
  •   १५०व्या जयंतीनिमित्त  १५० कोटी रुपयांचा निधी

मुंबई : महात्मा गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त विविध धोरणे आणि कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी १५० कोटी रुपयांचा निधी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

महात्मा गांधी यांची १५०वी जयंती अधिक नावीन्यपूर्ण उपक्रमाच्या अंमलबजावणीतून साजरी करताना राबवावयाच्या कार्यक्रमाबाबत सर्व प्रशासकीय विभागांच्या प्रमुखांना पत्र पाठवून सूचना मागविण्याच्या सूचना मुनगंटीवार यांनी दिल्या. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News