आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या 13 खेळाडूंचा सहभाग

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019
  • शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा जोर अजमावणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी जलतरण, सायकलिंग आाणि धावणे या प्रकारात उल्लेखनीय कामगिरी
  • विविध देशांतील 27 जणांनी सहभाग नोंदवला

कोल्हापूर : युरोप मधील आॅस्ट्रीया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत कोल्हापूरच्या 13 जणांनी सहभाग नोंदवला. शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा जोर अजमावणाऱ्या या स्पर्धेत त्यांनी जलतरण, सायकलिंग आाणि धावणे या प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली. या स्पर्धेत विविध देशांतील 27 जणांनी सहभाग नोंदवला असून त्यातील 13 जण हे कोल्हापूरचे असल्यामुळे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये कुमार ब्रिजवाणी (15.18), अविनाश सोनी (15. 41), वैभव बेळगावकर- सुतार (15.54), अमर धामणे (16.9), उदय पाटील (16.4 ), वरुण कदम (14.21), यश चव्हाण (13.13), अतुल पवार (14.45 ), वीरेंद्र घाटगे (15.4), स्वप्निल कुंभारकर (14.59), बाबासाहेब पुजारी (15.12) यांनी ही स्पर्धा पूर्ण तर उत्तम फराकटे आणि बसवराज येंटापुरे यांच्या सायकल मध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे स्पर्धा पूर्ण करू शकले नाहीत. 

या स्पर्धकांना जलतरणसाठी नीळकंठ आखाडे यांनी मार्गदर्शन केले. तर सायकलिंग आणि धावण्यासाठी पंकज रावळू, आशिष रावळू आणि अश्विन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी केली होती. ही स्पर्धा क्लेगनफर्टमध्ये रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी सात वाजता स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेमध्ये प्रथम 3.8 किलोमीटर जलतरण 2 तास 20 मिनिटांच्या निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करायचे होते. थंड हवामानामुळे पाण्याचे तापमान देखील अतिषय थंड असल्यामुळे  जलतरण अधिक कठीण होते. या नंतर 180 किलोमीटरचे चढ-उतार व वळणांवरील आव्हानात्मक सायकलिंग झाले. त्यानंतर 42 किलोमीटर धावणे याचा समावेश या स्पर्धेमध्ये होता. जलतरण, सायकलिंग आणि धावणे हे सर्व प्रकार नियोजित 17 तासांत पूर्ण करणाऱ्या खेळाडूला ‘आयर्नमॅन’ हा किताब प्रदान केला जातो.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News