राज्य मंत्रिमंडळात १३ नवीन चेहरे; शपथविधी सोहळ्याला सुरुवात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 16 June 2019

आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण १३ जण मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. तर भाजपच्या काही विद्यमान मंत्र्यांना यंदा डच्चू देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली आहे. 

तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्याही यांना कॅबिनेट पद देण्यात आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे, सुरेश खाडे, बाळा भेगडे, परिणय फुके यांना संधी देण्यात आली आहे. आदिवासी मंत्री विष्णू सावरा, दिलीप कांबळे, राजकुमार बडोले या मंत्र्यांचाही पत्ता कापण्यात आलाय.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News