बारावी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 17 June 2019
  • महाविद्यालयाचा निकाल 91. 84 टक्के
  • यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन शुभदा देवी भोसले यांच्या हस्ते देऊन करण्यात आला

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित राजमाता सत्वशीलादेवी भोसले कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यातील महाविद्यालयातून प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

महाविद्यालयाचा निकाल 91. 84 टक्के लागला. यात प्रियंका बागवे 90 टक्के मिळवून तालुक्यात प्रथम आली. तर महाविद्यालयात यश ठाकूर 89. 69 टक्के मिळून द्वितीय व संकेत गोरे 89. 84 टक्के गुण मिळवून तृतीय आला. वाणिज्य शाखेतील स्नेहा पेडणेकर 83.84 टक्के, मुस्ताक मेमन 83.69 टक्के तर श्रीया मठकर 78.30 टक्के असे अनुक्रमे आले. कला शाखेची सुचिता चव्हाण 74.15 टक्के, प्रेम चोडणकर 71.84 टक्के, सोनाली कुंभार 70. 30 टक्के या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन शुभदा देवी भोसले यांच्या हस्ते देऊन करण्यात आला.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल. भारमल,  कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. टक्केकर, महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्ग पालक उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News