12 एक्कर शेती असलेल्याला फक्त पावसाने आणले काही क्षणात रस्त्यावर

तृषा वायकर (यिनबझ)
Monday, 15 July 2019

आसाममध्ये पुराच्या घटना काही नवीन नाहीत. पुरामध्ये कित्येक जणांचा बळी जातो तर अनेकांची घरे उध्वस्त होतात. मूलं-बाळ रस्त्यावर येतात. यावेळच्या पुरात 3181 गावं वाहून गेली. बचाव पथकानेही मोठ्या प्रमाणात पूर सदृश परिस्थितीला निवारण्याचे प्रयत्न केले. मात्र अनेकांचे संसार आणि साहित्य वाचवण्यात बचाव पथकाला अपयश आले. अशाच एका पुरामध्ये  वाहून गेलेल्या एका श्रीमंत शेतकऱ्याची ही कहाणी आहे.

आसाममध्ये पुराच्या घटना काही नवीन नाहीत. पुरामध्ये कित्येक जणांचा बळी जातो तर अनेकांची घरे उध्वस्त होतात. मूलं-बाळ रस्त्यावर येतात. यावेळच्या पुरात 3181 गावं वाहून गेली. बचाव पथकानेही मोठ्या प्रमाणात पूर सदृश परिस्थितीला निवारण्याचे प्रयत्न केले. मात्र अनेकांचे संसार आणि साहित्य वाचवण्यात बचाव पथकाला अपयश आले. अशाच एका पुरामध्ये  वाहून गेलेल्या एका श्रीमंत शेतकऱ्याची ही कहाणी आहे.

गेल्या रविवारी आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पुरामुळे अनेक पूल, बंधारे वाहून तेथे गेल्याने अजूनच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या पूरसदृश परिस्थितीला निवारण्याचे काम एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकाकडून सुरूच आहे, पथकांकडून तेथील लोकांना सुरक्षित स्थळी हालवण्याचे काम दिवस रात्र सुरू आहे.

आसाममध्ये एकूण ३२ जिल्ह्यांपैकी २८ जिल्हे पुरग्रस्थ आहेत. हा पूर तब्बल १९८६ नंतरचा सर्वात मोठा पूर असल्याची माहिती आहे. आसामधली अनेक कुटुंबे या पुरात वाहून गेली तर अनेक कुटुंबाचा उदर निर्वाहाचं साहित्यच वाहून गेले. अशाच एका आसाममधल्या मीठाम गावातील पुरग्रस्त शेतकरी आपली कथा व्यक्त करत आहेत.

मीठाम गावातले मंटू नावाचे गृहस्थ सांगतात की ''आम्ही मीठाम नावाच्या चापोरी गावात ६० वर्षांपासून राहत होतो. एक काळ असा होता की आमच्याकडे १२ एकर जमीन होती; पण पुरामुळे आणि जमिनीचे भूस्खलन झाल्यामुळे सगळी जमीन नष्ट झाली''

त्यांचं कुटुंब फक्त शेतीवर चालायचं; पण आता त्याची खूप बिकट परिस्तिथी आहे. दोन वेळेचे धड खायलाही मिळत नाही. आमची मुलं आमच्या जवळ नाहीत. ते 'हे' गाव सोडून गेलेत. सरकारने जर येथे वेळीच बांध बांधला असता तर आज आमची ही अशी अवस्था झाली नसती, असे त्यांचे म्हणणे आहे.

'या' पुरामध्ये शेकडोजण रस्त्यावर अली आहेत. अनेक कुटुंबांनी आपल्या जमिनी गमावल्या आहेत. १९५० पासून आजपर्यंत २५  पूर आले आहेत. जलवायु परिस्थिती असल्यामुळे इथे पुराचा धोका नेहमीच असतो. ज्याचे घर पहिले शेतीवर चालायचे ते आता भूस्खलनामुळे बेघर आहेत. त्यामुळे उध्वस्त झालेल्या कुटुंबांना आणि बेघर झालेल्या संसारांना मदत मिळावी हीच आपेक्षा वेगवेगळ्या स्तरावरून व्यक्त केली जात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News