दहावी परीक्षेत सोलापूरचा टक्‍का घसरला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • जिल्ह्याचा 81.43 टक्के निकाल, गतवर्षीपेक्षा 9 टक्क्यांनी निकाल कमी, यंदाही मुलींचीच बाजी 

सोलापूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी 1 वाजता जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्याचा एकूण 81.43 टक्के निकाल लागला असून गतवर्षीपेक्षा यंदा दहावीच्या निकालात 9 टक्क्यांची घसरण झाली आहे. यंदाही दहावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. 

इयत्ता दहावीसाठी सोलापूर जिल्ह्यातून एकूण 64 हजार 594 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 52 हजार 596 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 35 हजार 625 मुलांपैकी27 हजार 82 मुले उत्तीर्ण झाली. मुलांची टक्केवारी 76.02 टक्के आहे. जिल्ह्यातून 28 हजार 969 विद्यार्थिनी परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी 25 हजार 514 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी 88.07 टक्के असून मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी अधिक आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News