आज दहावीचा निकाल जाहीर होणार? परीक्षेचा निकाल कसा पाहाल? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

पुणे : बारावीचा निकाल लागून आता जवळपास आठ दिवस झाले आहेत. त्यामुळे सर्वांचचं लक्ष आता दहावीच्या निकालाकडे लागले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीचा निकाल जाहीर करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. 

दहावीच्या निकाल नेमका कधी जाहीर होणार याबाबत बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर आज जाहीर केलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. निकालासंबंधीची सगळी माहिती विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात. दहावी बोर्ड (SSC) २०१९ परीक्षेसाठी यंदा १७ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले  होते. यंदा दहावीची परीक्षा ही मार्चमध्ये घेण्यात आली होती. मागील वर्षी दहावीचे निकाल हे ८ जून २०१८ रोजी जाहीर करण्यात आले होते. 

दहावीचा निकाल पाहण्यासाठी  या वेबसाइटवर जा.

www.mahresult.nic.in,

www.mahahsscboard.maharashtra.gov.in

यानंतर Maharashtra SSC Result 2019 रिझल्ट लिंकवर क्लिक करा. 
त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा. 
Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2019 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News