आयटीआयच्या विद्यार्थ्यांनां १०० टक्के रोजगार!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील ४१ आयटीआयमध्ये तीन सत्रांत प्रशिक्षण दिले जाते.

मुंबई - महाराष्ट्रात ४१७ सरकारी आणि ५३८ खासगी आयटीआय कार्यरत आहेत. त्यातील प्रवेश क्षमता सुमारे एक लाख ३० हजार आहे. ७९ प्रकारच्या विविध व्यवसाय अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यात अभियांत्रिकी गटातील एक वर्षाचे २३ तर दोन वर्षांचे ३२ अभ्यासक्रम आहेत. त्याचप्रमाणे बिगर अभियांत्रिकी गटात एक वर्षाच्या २४ अभ्यासक्रमांचा अंतर्भाव आहे. राज्यात १५ आयटीआय फक्त मुलींसाठी असून इतर आयटीआय संस्थांमध्ये मुलींसाठी ३० टक्के आरक्षण आहे.

त्याचप्रमाणे महापालिका क्षेत्रातील ४१ आयटीआयमध्ये तीन सत्रांत प्रशिक्षण दिले जाते. यावर्षी आयटीआय अभ्यासक्रम हा नॅशनल स्कील क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क (एनएसक्‍युएफ) या नव्या संरचनेनुसार अद्ययावत केलेला आहे. त्यानुसार प्रत्येक अभ्यासक्रमांचा स्तर निश्‍चित केला आहे.आयटीआयमध्ये कोणताही अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्यानंतर रोजगाराच्या शंभर टक्के संधी उपलब्ध होतात. परंतु विद्यार्थ्यांचा ओढा काही ठरावीक अभ्यासक्रमांकडे जास्त आहे.

प्लंबर, मेसन, कार्पेंटर, पेंटर अशा काही अभ्यासक्रमांकडे ओढा कमी दिसतो. 
दहावीला ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त गुण मिळालेले विद्यार्थी आणि बारावी किंवा त्यापुढे शिक्षण घेतलेले बरेचजण दहावीच्या गुणांवर आयटीआयमध्ये प्रवेश घेत आहेत. औद्योगिक क्षेत्रात महिलाही आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींनी आयटीआयचा अभ्यासक्रम करिअर म्हणून निवडायला हरकत नाही.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज वाढत असताना बाजारपेठेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. अशा परिस्थितीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) अभ्यासक्रम हमखास रोजगार मिळवून देण्यात यशस्वी ठरत आहेत.
- प्रकाश सायगावकर, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), औंध

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News