करण जौहरने दिले 'या' साउथ रिमेकसाठी ६ कोटी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 30 July 2019

साऊथ चित्रपटांचे हिंदी रिमेक बॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी चालतात. ‘कबीर सिंग’ हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. बॉलीवूडचे निर्माते-दिग्दर्शकही साऊथ चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवण्याकडे धाव घेत आहेत. यामध्ये दिग्दर्शक करण जौहर पुढे सरसावला आहे.

मुंबई : साऊथ चित्रपटांचे हिंदी रिमेक बॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी चालतात. ‘कबीर सिंग’ हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. बॉलीवूडचे निर्माते-दिग्दर्शकही साऊथ चित्रपटांचे हिंदी रिमेक बनवण्याकडे धाव घेत आहेत. यामध्ये दिग्दर्शक करण जौहर पुढे सरसावला आहे. ‘डीअर कॉम्रेड’ या साऊथ चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार असल्याचे करणने काही दिवसांपूर्वीच घोषित केले होते.

अभिनेता विजय देवरकोंडाची मुख्य भूमिका असणारा हा चित्रपट साऊथमधील सुपरहिट चित्रपट. करणने या चित्रपटाचे अधिकृत हक्क चक्क सहा कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. करणने या चित्रपटासाठी दिलेली ही अवाढव्य रक्कम ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. करण या चित्रपटासाठी करत असलेला खर्च चित्रपटाला फायदेशीर ठरणार का, हेदेखील पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News