माणुसकीचे शत्रू

गणेश पावले
Saturday, 20 July 2019

वासनांध वणव्याची आग पसरली
रात्र रात्र झाली... काळोखी वैरी..

वासनांध वणव्याची आग पसरली
रात्र रात्र झाली... काळोखी वैरी..
काय करील सांगा सावज ?
घेण्यास जीव... सज्ज झाल्या फैरी..

सैरवैर जीवन सारे, दाही दिशा गोंधळलेल्या
काळ घेई झेप उलटी, फाडी पदर लज्जेचा
पीती घोट वासनेचा, छातीवरती नजरा खिळलेल्या
धाय मोकलून रडे धरणी, धावा करे कृष्णाचा

कधी कोण कुठे घालील घाला..?
जिवास वाचविण्या... रानी धावे हिरणी
लक्तरे इज्जतीची... तोडीती पिपासू
अशीच कोपर्डीची... प्राणास मुकली मर्दानी

इभ्रतीवर घाव पडता, जीवन व्यर्थ होई सारे
पेटवा कँडल आणि मशाली, फक्त दोन दिवस रस्त्यावर का रे..?
उठा, लढा.. या आज सारे! करा रक्षण आई-बहीणीचे !
छाटा पाप्यास करा चौरंग, मारा शत्रू माणुसकीचे !

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News