तुम्ही अशी पुडचटणी बनवता ना ?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

- फोडणी गार झाल्यावर वरील जिन्नस (क्र. २.३.४.५) क्रमाने एकानन्तर एक फोडणीत घालावे आणि मिक्स करावे.

 

 • हरभरा डाळ १ पेला
 • उडीद डाळ १/२ पेला
 • तीळ १/२ पेला
 • तांदुळ १/२ वाटी
 • गुळ १/४ किलो
 • मोहोरी २ छोटे चमचे
 • जिरे २ छोटे चमचे
 • मेथी दाणे २ छोटे चमचे
 • हिंग चवीनुसार
 • मीठ चवीनुसार
 • लाल तिखटाची पूड १ वाटी
 • सुके खोबरे बारिक किसून अथवा पुड करून
 • हळद १/२ छोटा चमचा
 • तेल भाजण्यासाठी व फोडणीसाठी

क्रमवार पाककृती: 
१ - तांदूळ, तीळ व डाळी तेलावर खमंग भाजुन घ्याव्यात.
(भाजण्याची क्रिया करत असताना जितकी आच कमी ठेवाल तितके चान्गले भाजले जाईल)
२ - डाळी, तांदूळ, तीळ (वेगवेगळे) बारिक वाटून घ्यावे
३ - चिंच तेलावर परतुन घ्यावी व बारिक करुन घ्यावी
४ - तिखटाची पूड, सुके खोबरे तेलावर परतून घ्यावे
५ - गूळ बारीक किसून घ्यावा

- तेलात मोहरी, जिरे ,हिन्ग, मेथी दाणे व किन्चित हळद घालून फोडणी करावी
- फोडणी गार झाल्यावर वरील जिन्नस (क्र. २.३.४.५) क्रमाने एकानन्तर एक फोडणीत घालावे आणि मिक्स करावे.
- चवीनुसार मीठ घालावे आणि मिक्स करावे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News